Skip to main content

Posts

Showing posts from 2014

2013

मी  २०११ मधील आठवणी लिहिल्या होत्या. २०१२ मध्ये आळशीपणा केला. पण या वर्षी ठरवलंय मी, उशीर झाला तरी चालेल पण लिहायचं. खरं सांगायचं तर सगळं किती बदलल्या सारखं वाटतं. म्हणजे दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी वाचून तर मी खूप दूर आल्यासारखं वाटतं मला. आणि मला माहितेय ही चांगली गोष्ट आहे, कारण माझा प्रवासावर खूप विश्वास आहे. ३६५ दिवसांत जर तारखेशिवाय काही बदललं नसेल, तर ते दिवस वाया गेल्या सारखे आहेत. नाही का? आता मी सांगेन त्या आठवणी ह्या घटनाक्रमानुसार (order-of-occurence :P) आहेत, त्यात आवड-नावड असं काही नाही. :D १.       Canvas 2 गेल्या वर्षी जानेवारी मध्ये मला माझा पहिला वहिला smartphone मिळाला. देसी कंपनी चा स्वस्त आणि मस्त फोन! जेव्हा मी ठरवलं कि हा फोन घ्यायचा तेव्हा अर्थात बरयाच लोकांनी नाकं मुरडली. पण खरं सांगते, it’s been really good! J कॅमेरा पेक्षा फोटोग्राफर महत्त्वाचा तसेच फोन वापरणारा कितपत फोन चा वापर करतो हे महत्त्वाचं ! मी नेहमी फोन ला चिकटून असते हि एक बाब सोडली तर, सगळं किती सोपं वाटतं ह्या फोन्स मुळे. ह्या फोन मुळे अजून एक अगदी सहज शक्य झालेली गोष्ट म्हणजे